Question
Download Solution PDFविसर्गसंधीची उदाहरणे कोणती?
(a) सदानंद, सज्जन
(b) सूर्यास्त, विद्यामृत
(c) निराधार, मनोबल
(d) निराधार, सज्जन
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFउत्तर - (a), (b), (d) चूक, (c) बरोबर हे योग्य उत्तर होईल.
निराधार, मनोबल ही विसर्गसंधीची उदाहरणे आहेत.
विसर्गसंधी - एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर तेव्हा त्यास विसर्ग संधी असे म्हणतात.
विसर्ग + व्यंजन किंवा विसर्ग + स्वर असे त्याचे स्वरूप असते.
निराधार = नि: + आधार
मनोबल = मनः + बल
Important Pointsसंधी - जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोन्हीबद्दल एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी असे म्हणतात.
संधीचे तीन प्रकार आहेत.
- स्वरसंधी
- व्यंजनसंधी
- विसर्गसंधी
स्वरसंधी - एकमेकांच्या शेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना स्वरसंधी असे म्हणतात.
स्वर + स्वर असे याचे स्वरूप असते. उदा. विद्या + अमृत = विद्यामृत (आ + अ = आ)
व्यंजनसंधी - जवळ जवळ येणाऱ्या या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात.
व्यंजन + व्यंजन किंवा स्वर असे त्याचे स्वरूप असते. उदा. सत् + आचार = सदाचार (त् + आ)
विसर्गसंधी - एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर तेव्हा त्यास विसर्ग संधी असे म्हणतात.
विसर्ग + व्यंजन किंवा विसर्ग + स्वर असे त्याचे स्वरूप असते. उदा. नि: + अंतर = निरंतर
Additional Informationसदानंद, सज्जन ही व्यंजनसंधीची उदाहरणे आहेत.
सदानंद हे तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण आहे.
सदानन्द = सत् + आनंद
एकत्र येणारे वर्ण = त् + आ = द् + आ = दा
झालेला बदल = त् चा द्
तयार झालेली संधी = सदानन्द / सदानंद
सज्जन = सत् + जन
एकत्र येणारे वर्ण = त् + ज् = ज् + ज् = ज्ज
झालेला बदल = त् चा ज्
तयार झालेली संधी = सज्जन
सूर्यास्त, विद्यामृत ही दीर्घत्व स्वरसंधीची उदाहरणे आहेत.
सूर्यास्त = सूर्य + अस्त (अ + अ = आ) स्वर + स्वर असे याचे स्वरूप आहे.
विद्यामृत = विद्या + अमृत (आ + अ = आ) स्वर + स्वर असे याचे स्वरूप आहे.
Last updated on Jun 12, 2025
-> MPSC Mains Final Answer Key 2025 for State Service is released on the official website.
-> MPSC Mains Admit Card 2025 for State Service is released. Exam on 29 May
-> MPSC has extended the date for online application fee payment. Candidates can now pay the fees online till 23 April, 2025.
-> The revised exam dates for the MPSC mains exam were announced. The State services main examination 2024 will be held on 27th, 28th & 29th May 2025 as per the revised schedule.
-> MPSC State service 2025 notification has been released for 385 vacancies.
-> Candidates will be able to apply online from 28 March 2025 till 17 April 2025 for MPSC State service recruitment 2025.
-> Selection of the candidates is based on their performance in the prelims exam, mains exam and interview.
-> Prepare for the exam using the MPSC State Services Previous Year Papers.
-> Also, attempt the MPSC State Services Mock Test to score better.
-> Stay updated with daily current affairs for UPSC.