बालकाच्या सामाजीकरणात कुटुंब _________ भूमिका बजावते.

This question was previously asked in
CTET Feb 2016 Paper 1 (L - I/II: Hindi/English/Sanskrit)
View all CTET Papers >
  1. प्रेरक
  2. प्राथमिक
  3. दुय्यम
  4. महत्त्वाची अशी नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : प्राथमिक
Free
CTET CT 1: TET CDP (Development)
72.4 K Users
10 Questions 10 Marks 8 Mins

Detailed Solution

Download Solution PDF

स्पष्टीकरण:

सामाजीकरण ही अशी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे समुदाय एकमेकांशी व्यवहार करतात किंवा त्यांच्यातील सदस्यांना समाजाच्या निकष आणि मूल्यांबद्दल सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य होण्यासाठी शिक्षित करतात. सामाजीकरण हे व्यक्तिमत्व विकास व सांस्कृतिक विकास यांचे एक संयोजन आहे.

हे एक असे कार्य आहे, जे पुढील घटकांची खात्री देते:

  • शिष्टाचार तसेच संस्कृतीचा प्रसार.
  • सामाजिक नियम व मूल्यांचे अनुकूलन.
  • समाजाच्या वृत्ती व चालीरीतींचे अंगीकरण.

सर्व प्रकारच्या सामाजीकरणाचे दोन मोठ्या गटांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते, उदा. प्राथमिक सामाजीकरण व दुय्यम सामाजीकरण. हे वर्गीकरण व्यक्तींच्या प्राथमिक व दुय्यम गरजांवर आधारित असते.

Important Points

सामाजीकरणाचे प्रकार थोडक्यात:

प्राथमिक सामाजीकरण

  • तहान, भूक इत्यादी मूलभूत शारीरिक गरजांना प्राथमिक गरजा म्हणतात.
  • कुटुंब मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करते, म्हणून कुटुंबाला प्राथमिक संस्था म्हणतात.
  • पालक हे मुलाचे प्राथमिक सामाजिक घटक असतात.
  • कुटुंबाचे निकष व मूल्ये जोपासणे याला प्राथमिक सामाजीकरण म्हणतात.
  • प्राथमिक सामाजीकरण अर्भकावस्था आणि बाल्यावस्थेमध्ये होते. सामाजीकरणाचा हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे; कारण या टप्प्यावरच बालक वर्तणूक पद्धती शिकते.
दुय्यम सामाजीकरण
  • ज्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी याची गरज असते, उदा. उदरनिर्वाहासाठी कौशल्ये शिकण्याची गरज.
  • शाळा ही दुय्यम सामाजिक संस्था आहे; कारण ती बालकांच्या व्युत्पन्न गरजा पूर्ण करते.
  • शाळेतील शिक्षक हे दुय्यम सामाजीकरण करणारे घटक असतात.
  • शाळेतील नियम, मूल्ये व वर्तणूक पद्धती आत्मसात करण्याच्या प्रक्रियेला दुय्यम सामाजीकरण म्हटले जाऊ शकते.
  • सामान्यतः, दुय्यम सामाजीकरण उत्तर बाल्यावस्थेच्या टप्प्यापासून सुरू होते आणि प्रौढत्वापर्यंत होत असते.

म्हणून, येथे असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की, बालकाच्या सामाजीकरणात कुटुंबाची प्राथमिक भूमिका असते.

Latest CTET Updates

Last updated on Apr 30, 2025

-> The CTET 2025 Notification (July) is expected to be released anytime soon.

-> The CTET Exam Date 2025 will also be released along with the notification.

-> CTET Registration Link will be available on ctet.nic.in.

-> CTET is a national-level exam conducted by the CBSE to determine the eligibility of prospective teachers.  

-> Candidates can appear for CTET Paper I for teaching posts of classes 1-5, while they can appear for CTET Paper 2 for teaching posts of classes 6-8.

-> Prepare for the exam with CTET Previous Year Papers and CTET Test Series for Papers I &II.

Get Free Access Now
Hot Links: teen patti lucky teen patti master download teen patti diya online teen patti real money teen patti wealth